महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [MSEDCL] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४५० जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [MSEDCL] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४५० जागा

 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Distribution Company Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक ०७ ऑगस्ट २०१९ पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी-स्थापत्य (Graduate Engineer-Trainee-Civil) : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत 

पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी-स्थापत्य (Diploma Engineer-Trainee-Civil) : १४ जागा

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा).

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी-वितरण (Diploma Engineer-Trainee-Distribution) : ४०८ जागा 

शैक्षणिक पात्रता : विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा).

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

सुचना - वयाची अट : २० ऑगस्ट २०१९ रोजी [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय : २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ७७,०००/- रुपये

परीक्षा दिनांक : ऑगस्ट २०१९

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.